Popular Posts

Wednesday, September 12, 2012

भविष्य जन्म-मृत्यूचे...!


जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो, तेव्हा त्या जन्मदात्या मातेला काय आनंद होतो याचं वर्णन कोणीच करु शकत नाही. त्याचा अनुभव हा फक्त तिचाच असतो. असेच एक भविष्य.

एका कुटुंबातील प्रथम संतती कन्या आहे आणि मुलाची अभिलाषा आहे. ती माता गरोदर असते. दिवस पूर्ण होतात. एके क्षणी बाळ जन्माला येते. तो मुलगाच असतो. त्या वेळेचा आनंद हा ज्याला त्यालाच ठाऊक. पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. कारण जन्मलेलं बाळ फारच अशक्त होतं. त्यामुळे काचेच्या पेटीत त्याला श्वास घ्यावे लागत होते.

मला बातमी कळाली ती प्रथम आनंद व्यक्त करणाच्या दृष्कोनातून आणि दुस-यांदा फोन आला ते त्याची पत्रिका , ग्रहमान कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी.

माझ्या सवयीप्रमाणे मी ते केले. त्याचं उत्तर मात्र निराशाजनक येत होतं. मी ते त्यांना लगेचच सांगितले नाही. कारण ते बालक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचा हा संघर्ष चालूच रहाणार होता आणि त्याचा काही उपयोगही होणार नव्हता. हे ही उघड दिसत होत.

मी काही गोष्टींबाबात थोडेफार मौनच पाळणं योग्य समजतो. कुणाचा अगदी तंतोतंत मृत्यू सांगणे हे जरी अभिमानाची बाब होत असली तरी ते अगोदरच सांगून प्रयत्न करणा-यांना नाऊमेद करणे मला आवडत नाही.

त्या बाळाचे आयुष्य फक्त पाच-सहा दवसांचे होते. तेवढीच त्याच्या आयुष्याची कमाल मर्यादा होती. जो पर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्याचा जगण्याचा संघर्ष चालू होता.... आणि एके क्षणी त्यानी आपले जीवन संपवलं.

कधी कधी दुःख, भोग भोगण्यासाठीच एखादा जीव जन्माला येतो. तो ते भोगतो आणि आपले जीवन संपवितो. मृत्यूचे असे हे भाकित अगदी लहानपणीसुध्दा करावं लागतं. नाईलाजास्तव.

म्हतारपणी-वृध्दावस्थेत हे जरी करायचे म्हटले तरी थोडं फार वाईट वाटते..

पण मृत्यू हाच सुटकेचा मार्ग असतो हे मात्र सत्य आहे.



श्रीकांत आफळे,
सी ३-९, गुरुराज हौसिंग सोसायटी,
पद्मावती, पुणे ४११०३७
फोन- ०२०-२४३६७५३२
मो. ९८९०३४८८७७
Email- shrikantmaitreya@gmail.com




Thursday, August 30, 2012

भविष्य हे खरं शास्त्र आहे


माझ्या बाबतीत एक लहानपणीची गोष्ट सांगाविशी वाटते. माझे वय साधारण दहाच्या आतल्या घरात असेल. काही समस्या घेऊन माझे वडिल एका परधर्मिय व्यक्तिकडे गेले होते. त्याला त्यांनी तीन समस्या सांगितल्या. एक त्यांना असलेली संतती. जिला मेंदूचा विकार झालाय. वारंवार फिट य़ेतात. ही व्यक्ति बरी होईल का?

दुसरी समस्या. दुसरी संतती शिक्षणात सतत अपयशी होती आहे. ही शिकेल काय ?

आणि तिसरी समस्या नव्हती पण एक मार्गदर्शन हवे होते.

त्या व्यक्तिने जे भविष्य मला नव्हे तर वडीलांना सांगितले. ते मला आजही आठवते. त्यांचा शब्द न शब्द खरा झाल्याचे मला आजही स्मरते.

त्यांची जी एक संतती आजारी होती ती कधी बरी झालीच नाही. तर त्यांनी जी आयुष्याची कमाल मर्यादा सांगितली होती. बरोबर त्याच काळात त्या व्यक्तिने आपली जीवनयात्रा संपविली.

दुस-या संततीच्या बाबतीत एका वयाच्या विशिष्ठ काळानंतर तो खूप शिकेल. आत्ताचे जे अपयश आहे ते बदलणार नाही. आणि त्यांनी जे भविष्य़ सांगितले त्याप्रमाणे ते घडलही. अगदी तंतोतंत खरेही .

तिसरे मार्गदर्शन केले होते . ही संतती तांत्रिक शाखेकडील शिक्षण घेईल आणि घडले त्याप्रमाणेच.

ही तीनही भाकिते माझ्या लहानपणी कुणीतरी सांगितलेली. पण त्याचा परिणाम माझ्यावर खोलवर झाला. माझ्यातील आज कांही ज्योतिषी आहे. त्याची पाळंमुळे कुठेतरी या गोष्टीत आहेत असं मला वाटतं.

भविष्य हे शास्त्र आहे. भविष्य हे खरं शास्त्र आहे आणि ते बदलता येत नाही. तिन्ही गोष्टी आजही माझ्या मनात जशाच्या तशा अढळ आहेत, हे मात्र नक्की.

-श्रीकांत आफळे,
सी ३-९, गुरुराज हौसिंग सोसायटी,
पद्मावती, पुणे ४११०३७
फोन- ०२०-२४३६७५३२
मो. ९८९०३४८८७७
shrikant maitreya shrikantmaitreya@gmail.com